भुसावळ विभागातून 16 रेल्वे गाड्या 1 जूनपासून धावणार

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता मात्र हळूहळू परीस्थितीत बदल होत असल्याने 1 जूनपासून देशभरात 200 गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून त्यातील 16 गाड्या या भुसावळ विभागातून धावणार आहेत. दरम्यान, या गाड्यांचे गुरुवार, 21 पासून ऑनलाईन आरक्षण सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळ विभागातून या गाड्या धावणार
1 जूनपासून भुसावळ विभागातून धावणार्‍या गाड्यांमध्ये कुशीनगर एक्सप्रेस, पवन एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, हावडा मेल वाया नागपूर, अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, ताप्ती गंगा एक्स्प्रेस, गोरखपूर-कुर्ला सुपरफास्ट, पुणे-दानापुर एक्स्प्रेस, गुवाहाटी एक्स्प्रेस आणि गोवा एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

Copy