भुसावळ विभागातील 10 कर्मचार्‍यांकडून कोरोना निधी

0

भुसावळ : कोरोना कोवीड 19 या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्ये हाहाःकार माजविला असून आपल्या देशाला सुध्दा त्याचा फटका बसला आहे. अशा नाजुक परीस्थितीत भुसावळ विभागातील 10 रेल्वे कर्मचार्‍यांनी पुढाकार घेत कोरोना कोवीड 19 च्या लढ्यात केंद्र सरकारला मदतकार्य केले आहे.

पीएम केअर फंडासाठी कर्मचार्‍यांचे मोलाचे योगदान
विभागातील बडनेरा येथील मालगाडी गार्ड दिलीप सिंग सरदार सिंग, नांदगाव येथील मालगाडी लोको पायलट सतीशचंद्र जे.गीते, भुसावळ येथील विद्युत टीआरएस मधील तंत्रज्ञ रवींद्र चिखलकर व मुख्य कल्याण निरीक्षक दीपा स्वामी या चौघांनी आपला एक महिन्याचा पुर्ण मुळ पगार, भुसावळ सी.अ‍ॅन्ड.डब्ल्यु विभागातील कार्यालय अधीक्षक (कार्मिक) मंगेश कुळकर्णी 50 हजार, मुख्य कार्यालय अधीक्षक (कार्मिक) एस.के.तिवारी 25 हजार, भादलीचे उपस्थानक व्यवस्थापक दीपक रामदास चिलवंत व प्रयोगशाळा अधीक्षक ओम प्रकाश पांचोली प्रत्येकी 11 हजार रुपये व भुसावळ कार्मिक विभागातील कनिष्ठ लिपीक चुमूनसिंह व रेल्वे स्कुलच्या सहाय्यक शिक्षीका संध्या यु.वसावे या दोघांनी आपला दोन दिवसांचे मुळ वेतन पीएम केअरला दिला आहे.

Copy