भुसावळ विभागातील सहा ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार

0

भुसावळ : रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी आरक्षण करण्यासाठी आणि तिकीट रद्द करण्यासाठी सोमवार, 8 जूनपपासून भुसावळ मंडळाच्या सहा ठिकाणी आरक्षण कार्यालय सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत एका शिफ्टमध्ये खिडकी सुरू होणार आहे. भुसावळ विभागातील नांदगाव, धुळे, पाचोरा, मलकापूर, यवतमाळ व अचलपूर येथे आरक्षण कार्यालय आता सोमवारपासून सुरू होणार आहे. या आरक्षण खिडकीवर तिकीटांचा परताचा 22 मार्च ते 30 एप्रिल पर्यंतचा आरक्षण तिकिटाचा परतावा हा दिला जाणार आहे आणि त्यानंतर स्लॅबनुसार आरक्षण तिकीट परतावा दिला जाणार आहे.

मास्क व डिस्टन्स पाळणे गरजेचे
1 मे ते 15 मे पर्यंतचे आरक्षण करण्यात आलेल्या प्रवाशांना 14 जूनपासून परतावा मिळणार आहे तर प्रवास सुरू होण्याची तारीख 16 ते 31 मे पर्यंतचा आरक्षण तिकीट परतावा 21 जूनपासून मिळणार आहे तसेच प्रवास सुरू होण्याची तारीख 1 ते 30 जूनदरम्यानचा परतावा 28 जून पासून मिळणार आहे. प्रवाशांनी आरक्षण कार्यालयात येताना मास्क लावून यावे तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Copy