भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी महिलेचा मृत्यू

भुसावळ : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक दोनवर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भुसावळ लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू
प्लॅटफार्म क्रमांक दोनवरील 65 वर्षीय अनोळखी महिला 28 जुलै रोजी बेशुद्धावस्थेत आढळल्याने तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. अनोळखी महिलेची उंची पाच फूट, रंग गव्हाळ, नाक बसके, शरीर बांधा सडपातळ, चेहरा, गोल, गळ्यात स्फटीक पांढर्‍या मण्यांची माळ, अंगात पोपटी रंगाचे ब्लाऊज, बारीक फुले असलेली नऊवारी साडी असे मयत महिलेचे वर्णन असून मयत भिकारी असल्याचा संशय आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांशी 02582-222338 वा तपासी अंमलदार एएसआय प्रकाश चौधरी (8830417598) वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.