Private Advt

भुसावळ रेल्वे स्थानकावर झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल लांबवला

भुसावळ : सेवाग्राम एक्स्प्रेसने शेगाव येथे जाण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या प्रवाशाला झोप लागल्याने झोपेचा फायदा घेत अज्ञाताने त्याचा मोबाईल लांबवला. ही घटना शुक्रवारी रात्री 10.25 वाजता घडली. याप्रकरणी जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला. शेगाव येथील रहिवासी जगन्नाथ घुले हे भुसावळ येथून सेवाग्राम एक्स्प्रेसने शेगावला जाण्यासाठी भुसावळ स्थानकावर थांबले होते. गाडीची वाट पहात असतांना त्यांना झोप लागली याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार सुधीर पाटील अधिक तपास करीत आहेत.