भुसावळ येथील मध्य रेल्वेचे हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

0

जळगाव- जळगाव जिल्हयात करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोव्हिड -19 विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपत्तकालीन व्यवस्था म्हणून “सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ” हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून Dedicated Covid Hospital म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ यांनी सदर हॉस्पिटल मधील 8 आयसीयु बेडसहीत एकूण 64 बेड राखीव ठेवावेत. या बेडची व्यवस्था ही केवळ कोव्हिड -19 विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्ती/रुग्ण यांचेकरीता असेल. सदर हॉस्पिटल मध्ये आवश्यक असणा-या मेडीकल स्टाफच्या उपलब्धतेसाठी जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. सेट्रल रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ यांनी प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणा-या सूचना, निर्देश, आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 नुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Copy