भुसावळ युवा सेनेतर्फे नवमतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

संपूर्ण भुसावळ तालुक्यात राबणार अभियान- हेमंत बर्‍हाटे

भुसावळ- विधानसभा मतदार नोंदणीसाठी शनिवारी भुसावळ युवासेनेतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष अभियानास भुसावळ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नाहाटा कॉलेजजवळ नवमतदारांची प्रचंड गर्दी उसळल्याने नमुना क्रमांक 6 अर्ज संपुष्टात संपलने झेरॉक्स प्रती काढून यंत्रणेला वेळ भागवावी लागली. शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख अविनाश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजता डॉ. निलेश महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमास सुरुवात झाली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी भुसावळ शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे (द.वि), निलेश महाजन (उ.वि), शहर संघटक योगेश बागुल, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, शिक्षकसेना तालुकाप्रमुख अतुल शेटे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पूनम बर्‍हाटे, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रकांता बोरसे, शहर संघटिका वासंती चौधरी, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख हेमंत बर्‍हाटे, युवा सेना शहर चिटणीस सुरज पाटील, कल्पेश बाविस्कर, सचिन सोनार, विशाल लोखंडे, गौरव पवार, कल्पेश सोनवणे, सुरेन्द्र सोनवणे, मनोज पाटील, पंकज परदेशी, भूषण सोनार, नितीन पाटील, युगेंद्र काकडे, पवन बाक्षे, मयुर जाधव, स्वप्नील पवार, ललीत सैतवाल, निलेश हिवरे व सर्व युवासैनीक उपस्थित होते.

ग्रामीण भागातही लवकरच अभिमान
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही नवमतदारांनी नावनोंदणीला सुरुवात करण्यात येत असून पुढील आठवड्यात संपूर्ण तालुक्यात अभियान राबवले जाणार आहे, असे हेमंत बर्‍हाटे कळवतात. मोहिमेत 450 पेक्षा जास्त अर्ज संकलित झाले आहेत. सर्व फॉर्म तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

Copy