भुसावळ मुख्याधिकार्‍यांना अपात्र करण्याबाबत दिवाणी दावा दाखल

भुसावळ : खुल्या मिळकतीचा वापर करणार नाही, असे वाटणीपत्रात नमूद करूनदेखील आदेशाचे उल्लंक्षण केल्यानंतर भुसावळ मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली मात्र त्यांनीदेखील तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने नगरपालिकेला नोटीस बजावूनदेखील पालिका प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने मुख्याधिकार्‍यांना अपात्र करण्याबाबत भुसावळ दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील रघुनाथ किसन कोळी हे नगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 125 .अ/ 1 या मिळकतीचे कब्जेदार असून मिळकत व वहिवाट अखंडपणे 33 वर्षांपासून करीत आहेत शिवाय नमूद मिळकतीच्या मालकात आपसात वाटणी करून सोडलेल्या खुल्या जागेवर कोणीही बांधकाम करणार नाही, असे वाटणीपत्रात नमूद करण्यात आले आहे. असे असताना पुरूषोत्तम नारायण गाजरे, प्रफुल्ल गाजरे, धनराज गाजरे, लिलाधर गाजरे व मोहिनी गाजरे यांनी अनधिकृत बांधकाम केली असल्याची तक्रार रघुनाथ यांनी 18 फेब्रुवारी रोजी 2021 रोजी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती मात्र मुख्याधिकारी यांनी तक्रारीची कुठलीही दखल न घेतल्याने त्यांनी शासकीय प्रतिमा मलीन केल्याने त्यांना शासकीय पदासाठी अपात्र करावे, अशी मागणी भुसावळ दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे रघुनाथ किसन कोळी यांनी दिवाणी दावा (34/2021) अन्वये अ‍ॅड.राजेश उपाध्यक्ष व अ‍ॅड.राजेश उपाध्याय यांच्या मार्फत केली आहे. दरम्यान, मुख्याधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Copy