भुसावळ मध्ये बंद दरम्यान दगडफेक

1

भुसावळ: बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या दरम्यान भुसावळ मध्ये बंद दरम्यान कार्यकर्त्यांनी काही दुकांनावर दगड फेक करण्याची घटना घटना समोर आली आहे. यात पोलिसांसह ४ नागरिक जखमी झाले असून शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी खडक चौफुलीवर रास्ता रोकोचाचा प्रयत्न केल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अभावाचे पेव फुटले असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भुसावळ शहरात अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे. सविस्तर वृत्त लवकरच..

Copy