भुसावळ भाजयुमोतर्फे 17 रोजी रक्तदान शिबिर

0

भुसावळ : भारतीय जनता युवा मोर्चा भुसावळ शहरतर्फे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुटवडा न जाणवण्यासाठी बुधवार, 17 जुन रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान जळगाव रस्त्यावरील लोणारी समाज मंगल कार्यालयात सर्व नियमाचे पालन करत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्ते यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यास पुढे येऊन रक्तदान करावे आणि राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे. नाव नोंदणीसाठी अनिकेत पाटील (8600864444), अनिरुद्ध कुळकर्णी (8007111130), व गौरव आवटे (9049409555) यांच्याशी संपर्क साधावा. प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Copy