भुसावळ : भाजपा पदाधिकार्‍यांनी काळे कपडे परीधान करीत केला राज्य शासनाचा निषेध

3

भुसावळ : शहराचे आमदार संजय सावकारे यांच्यासह शहरातील ठरावीक पदाधिकार्‍यांनी आपल्या अंगणात परीवारासोबत ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ आशयाचे फलक झळकावत शुक्रवारी आंदोलन केले. विशेष म्हणजे काळे कपडे व मास्क परीधान घालून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारवर टिका
राज्यातील महाविकास आघाडी सरकार करोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी आंदोलन केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्या निवासस्थानी शहराध्यक्ष दिनेश नेमाडे आदींनी निषेध नोंदवला तर भाजप ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी अजय भोळे यांनी म्युन्सीपल पार्क भागात निदर्शने केली.

Copy