भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या आठ कर्मचार्‍यांना कोरोना

3

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील तब्बल आठ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी आल्यानंतर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी भुसावळातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता तर त्यात बाजारपेठ पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याचा समावेश होता तर रात्री उशिरा पुन्हा आलेल्या अहवालात तब्बल सात कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. बाधीतांपैकी जळगाव येथून तीन कर्मचारी अप-डाऊन करतात तर पाच कर्मचारी स्थानिक रहिवासी असून या कर्मचार्‍यांना रेल्वे रुग्णालयात कॉरंटाईन करण्यात आले आहे.

Copy