Private Advt

भुसावळ बाजारपेठेत पार्किंग नसल्याने दुकानदारांच्या डोक्याला ताप

भुसावळ – मुख्य बाजारपेठेत कुठेही दुचाकी, चारचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग झोन नाही. यामुळे ग्राहक जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात. त्यातून अनेकवेळा ग्राहक-दुकानदारांमध्ये वाद होतात. नित्याच्या या कटकटी पाहता शहरातील मुख्य बाजारपेठेत पार्किंग झोनची गरज वाढली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील अप्सरा चौक ते डिस्काे टॉवर, नृसिंह मंदिर, शनी मंदिर वॉर्ड, मरिमाता मंदिर परिसर, सराफ बाजार, मॉडर्न रोड व अन्य बाजारपेठ भागात स्वतंत्र पार्किंग झोन नाही. यामुळे ग्राहकांना जागा मिळेल तेथे वाहने पार्क करावी लागतात. अप्सरा चौक ते डिस्को टॉवर दरम्यानच्या रस्त्यावर तर पायी चालण्यास जागा नसते. हातगाडी व्यावसायिकांसाठी राष्ट्रीय उपजीविका अभियानातून स्वतंत्र हॉकर्स झोन तयार करण्याबाबत हालचाली नाही. पालिका व अन्य खासगी संकुलामध्ये पार्किंगसाठी जागा न साेडल्याने दुकानदार व वाहनधारकांत वाद हाेतात.