भुसावळ पालिका उपनगराध्यक्षपदी प्रमोद नेमाडे बिनविरोध

भुसावळ  : भुसावळ पालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश निगराणी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त जागेवर गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक होवून नगरसेवक प्रमोद नेमाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार दीपक धीवरे यांनी बिनविरोध निवड केली. यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व नगराध्यक्ष रमण भोळे उपस्थित होते.

Copy