भुसावळ पाणीपुरवठा ठप्प ; ट्रान्स्फार्मर जळाला

भुसावळ : मुख्य पाईप लाईनवरील ट्रान्सफार्मर जळाल्याने शहराचचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पालिका प्रशासनाने याबाबत दखल घेत तातडीने ट्रान्सफार्मर बदलण्याच्या प्रक्रियेला गती दिली असून शहराला एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, तापी पात्रातील पाण्याची उचल करण्यासाठी असलेला ट्रान्सफार्मर गुरुवारी जळाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याला ब्रेक लागल्याने शहरवासीयांना आता एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल. गुरूवारी ज्या भागात पाणी पुरवठा केला जाणार होता, त्या भागात आता शुक्रवारी पाणी पुरवठा होणार आहे.