भुसावळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

0

भुसावळ : नोटबंदीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येवून निषेध नोंदविण्यात आला. रावेर येथे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. भुसावळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व आपल्या मागण्यांसंदर्भात तहसिलदार मिनाक्षी राठोड यांना निवेदन देण्यात आले. यात नमूद करण्यात आले की, नोटबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा. पुरेशा प्रमाणात बँकांमध्ये नवीन चलन उपलबध करावे. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव द्यावा. बीपीएलचा सर्व्हे करुन कार्ड देण्यात यावे. विधवा महिलांना अनुदान वितरीत करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहे. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन निकम, प्रदेश सदस्य पोपटराव पाटील, नाना पवार, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षा लिना तल्लारे, दिलीप सुरवाडे, वर्षा कर्णिक, विनोद निकम, विकास वलकर, रविंद्र साळवे, मुन्ना सोनवणे, राजेंद्र चौधरी, शेख सईद शेख इब्राहिम आदी उपस्थित होते.

रावेरला नायब तहसीलदारांना निवेदन
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार सी.एच. पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, पंचायत समिती उपसभापती मायादेवी बार्‍हे, पंचायत समिती सदस्या विजया पाटील, सुनिल कोंडे, प्रल्हाद बोेंडे, शकुंतला महाजन, प्रकाश पाटील, युवा अध्यक्ष दिपक पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, लक्ष्मण मोपारी, किशोर पाटील, पांडूरंग पाटील, बाळू पाटील आदी उपस्थित होते.

यावल शहरात काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने
येथे काँग्रेसतर्फे नोटबंदीविरोधात निदर्शने करण्यात आली व यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन चौकशीची मागणी करण्यात आली. या निवेदनावर माजी आमदार रमेश चौधरी, डॉ. सायरा तडवी, प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सभापती लिलाधर चौधरी, शहराध्यक्ष कदिरखान करीमखान, पंचायत समिती सभापती निर्मला फिरके, आरजू तडवी, लिना फिरके, प्रशांत पाटील, शरद महाजन, भगतसिंग पाटील, अमोल भिरुड, हाजी गफ्फार शहा, सुशिल फेगडे, अनिल जंजाळे, राजू पिंजारी, युनुस पटेल, नईम शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.

बोदवड येथे निषेध मोर्चा
येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अ‍ॅड. रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उध्दव पाटील, अ‍ॅड. के.एस. इंगळे, सतिश पाटील, तालुकाध्यक्ष शालिग्राम काजळे, संदिप पाटील, विलास देवकर, रामभाऊ म्हस्के, दुर्योधन गायकवाड, दिपक चौधरी, मनोज बोदडे, दिनकर पाटील, समाधान बोदडे, श्रीकृष्ण तांगडे, संजय पाटील, अशोक पाटील, अनिल मोरे, प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, राजू पाटील, भगवान चौधरी, विमल चौधरी, काशिनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.