भुसावळ पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व

0

भुसावळ । तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन गटात 13 तर पंचायत समितीच्या सहा गणात 23 अशा एकूण 36 उमेदवारांनी आपले नशिब आजमावले त्यात जिल्हापरिषदेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली तर पंचायत समितीमध्ये भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले असून सहापैकी चार जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा खेचून आणली.

साकेगाव कंडारी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र पाटील यांना 5 हजार 739 मते मिळाली असून ते 313 मतांनी विजयी झाले. तर भाजपाचे चुडामण भोळे यांना 5 हजार 426 मते मिळाली, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्ञानेश्‍वर आमले यांना 1 हजार 18 मते, शिवसेनेचे लालाराम जंगले 1 हजार 123, अपक्ष उमेदवार हर्षल नारखेडे 666, बसपाचे भूषण पाटील 369, अपक्ष यशवंत मोरे 1 हजार 393 मते मिळाली. या गटात 15 हजार 929 मतदारांनी आपला हक्क बजावला असून 199 मतदारांनी नोटा पर्याय वापरला आहे.

हतनूर-तळवेल गटात शिवसेनेच्या सरला कोळी यांनी 8 हजार 964 मते मिळवून विजय मिळविला असून काँग्रेसच्या अन्नपुर्णा पाटील यांनी 1 हजार 562, भाजपाच्या प्रज्ञा सपकाळे यांनी 7 हजार 751 मते मिळाली तर एकूण 18 हजार 675 मतदारांनी आपला हक्क बजावून 398 मतदारांनी नोटा पर्याय निवडला.

कुर्‍हे-वराडसिम गटात भाजपाच्या पल्लवी सावकारे यांना 9 हजार 204 मते मिळवून त्यांनी सर्वाधिक 4 हजार 277 मतांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या भाग्यश्री तायडे 3 हजार 267, अपक्ष उमेदवरार भारती पचेरवाल 1 हजार 10, राष्ट्रवादीच्या संगीता सपकाळे यांना 4 हजार 927 मते मिळाली. यामध्ये 18 हजार 575 मतदान झाले त्यापैकी 349 नोटा पर्याय वापरण्यात आला आहे.

पंचायत समिती गणातील लढती
साकेगाव गणात भाजपाच्या प्रिती मुकेश पाटील यांनी 3 हजार 453 मते मिळवून विजय प्राप्त केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोधी शहनाजबानो रईसखान यांनी 2 हजार 477 मते मिळविली. शिवसेनेच्या सुरेखा पाटील यांना 2 हजार 451 मते, एमआयएमच्या उमेदवार शेख जैतुन युसूफ यांना 508 मते मिळाली. यामध्ये 9 हजार 29 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात 140 मतदारांनी नोटा बटन दाबले.

कंडारी गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा निसाळकर यांनी 2 हजार 756 मतांनी विजय मिळविला. तर भाजपा उमेदवार चेतना झोपे यांना 2 हजार 489 मते मिळाली, अपक्ष उमेदवार सविता मोरे यांनी 1 हजार 436 मिळविली. याठिकाणी 6 हजार 904 मते मिळाली. तर 223 जणांनी नोटा पर्याय निवडला.

कुर्‍हे गणात भाजपा उमेदवार सुनिल महाजन यांनी 4 हजार 200 मतांनी विजय प्राप्त केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहन पाटील यांना 3 हजार 302 मते मिळाली, शिवसेनेचे सोपान भारंबे यांना 1 हजार 499, अपक्ष नारायण सपकाळे यांना 1 हजार 759 मते मिळाली. या गणात 123 जणांनी नोटा पर्याय वापरला.

वराडसिम गणात भाजपा उमेदवार मनिषा भालचंद्र पाटील यांनी 4 हजार 353 मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री पाटील यांना 3 हजार 253 मते मिळाली. या गणात 7 हजार 875 मतदान झाले त्यापैकी 269 जणांनी नोटा पर्याय वापरला.

तळवेल गणात शिवसेना उमेदवार विजय सुरवाडे यांनी 3 हजार 580 मते मिळवून विजय मिळविला. तर काँग्रेस उमेदवार शैलेश बोदडे यांना 697 मते मिळाली. अपक्ष उमेदवार उल्हास भारसके 1 हजार 240 मते, अपक्ष उत्तम सुरवाडे 98 मते, भाजपाचे सुधाकर सुरवाडे यांना 3 हजार 450 मते मिळाली. अपक्ष शैलेंद्र सोनवणे यांना 157 मते मिळाली.

हतनूर गणात- भाजपाच्या वंदना उन्हाळे यांनी 4 हजार 17 मते मिळवून विजय संपादन केला. तर शिवसेनेचे संतोष दोधू सोनवणे यांना 3 हजार 954 मते प्राप्त झाली. काँग्रेसच्या अलका भिल यांना 573 मते, अपक्ष सुनिल पवार यांना 668 मते मिळाली. या गणात 9 हजार 373 मतदारांनी आपला हक्क बजावला तर 161 मतदारांनी नोटाफ बटनाचा
वापर केला.