Private Advt

भुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ

भुसावळ : 01135 भुसावळ-दौंड मेमू विशेष साप्ताहिक गाडीला 27 जुलै ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालविण्यात येईल तसेच 01136 दौंड-भुसावळ मेमू विशेष साप्ताहिक यापुढे 29 जुलै व 31 ऑक्टोबर 2021पर्यंत चालविण्यात येईल. 01135/01136 विशेषच्या विस्तारीत फेर्‍या विद्यमान संरचना, वेळ आणि थांब्यांनुसार चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्वच निकष, एसओपी यांचे पालन करावे लागणार असून विशेष अतिजलद ट्रेनमध्ये बसण्यासाठी कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी देण्यात येणार आहे.