Private Advt

भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावातील सहा सहा वर्षीय मुलावर एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळ तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. 3 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजेच्या सुमारास मुलगा घरी असतांना संशयीत आरोपी फैजल अश्फाक शेख याने मुलाला जवळ बोलावून नवीन बॉल घेण्यासाठी 20 रुपये देतो, असे सांगून त्याच्या घरात नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाच्या घरच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने आरोपी फैजल अश्फाक शेख याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुमराम दळवी करीत आहे.