भुसावळ तालुका पोलिसांनी पकडली 60 लीटर गावठी दारू

0

भुसावळ : गावठी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करताना भुसावळ तालुका पोलिसांनी जयसिंग किसन इंगळे (मिरगव्हाण) यास पकडले असून त्याच्या ताब्यातून दोन कॅनमधील पाच हजार 400 रुपये किंमतीची 60 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, हवालदार विठ्ठल फुसे, संजू मोंढे, विजय पोहेकर, जगदीश भोई व होमगार्ड सेकोकारे यांनी केली.

Copy