भुसावळ तालुका पोलिसांनी 50 हजारांची दारू केली नष्ट

0

भुसावळ : लॉक डाऊनचा फायदा घेत तालुका हद्दीत मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयारी केली जात असल्याने तालुका पोलिसांकडून वॉश आऊट मोहिम राबवली जात आहे. शुक्रवारी तालुका पोलिसांनी निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात कारवाई करीत 50 हजार रुपयांची दारू नष्ट करीत गुन्हे दाखल केले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बेलवाय शिवारात वाघूर नदीच्या काठावर शुक्रवारी दुपारी 12.45 वाजता सीताराम रामा सोनवणे हा गावठी हात भट्टीची दारू गाळताना आढळला. पाच पत्री ड्रममध्ये 900 लिटर रसायन नष्ट करण्यात आले तसेच हातभट्टीची 55 लीटर तयार दारू जप्त करण्यात आली तर 34 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई गोंभी शिवारात वाघुर नदीच्या काठावर दुपारी पाच वाजता करण्यात आली. आरोपी समाधान सुभाष कोळी हा गावठी हात भट्टीची गाळत असताना पोलिसांनी धाड टाकत 10 प्लास्टीक कॅनसह एका पत्री ड्रममधील 450 लीटर रसायन नष्ट करण्यात आले तसेच 20 लीटर दारू जप्त करण्यात आली. 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

Copy