भुसावळ तालुका पोलिसांनी लाखाची गावठी दारू केली जप्त

3

भुसावळ : तालुक्यातील कन्हाळा गावाजवळील मसन्टी नाल्याच्या काळावर संशयीत आरोपी पीरू गंगा गवळी (रा.कन्हाळा) यास गावठी दारू बनवताना तालुका पोलिसांनी शुक्रवारी रंगेहाथ पकडत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीच्या ताब्यातून 15 ड्रममधील सुमारे दोन हजार 900 लीटर कच्चे रसायणासह गावठी हातभट्टीची 70 लीटर दारू मिळून एक लाख पाच हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार विठ्ठल फुसे, अजय माळी, युनूस शेख, प्रदीप इंगळे व पोलिस पाटील रेवसिंग पाटील आदींनी केली.

Copy