भुसावळ तहसील आवारात उभा असलेला डंपर भर दिवसा लांबवला

Bullying of illegal subordinate mineral mafia increased: Dumper was extended from Bhusawal tehsil office in broad daylight  भुसावळ  : भुसावळ तहसील कार्यालयातून अवैधरीत्या खडीची वाहतूक करणारे डंपर चार ब्रास खडीसह मंगळवारी सकाळी लांबवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डंपर लांबवण्यात आल्याची तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. या संदर्भात पोलिस प्रशासनाला डंपर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्रही देण्यात आले आहे.

तहसील आवारातून लांबवले डंपर
अवैधरीत्या खडीची करणारे डंपर (एम.एच.19 झेड. 6363) महसूल विभागाच्या पथकाने मंगळवार, 1 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले होते तसेच महसूल विभागातर्फे डंपर मालक मनोज सुरेश भागवत (साकेगाव) यांना दंडाबाबत नोटीसही बजावण्यात आली होती मात्र दंड भरण्यापूर्वीच डंपर लांबवण्यात आल्याने तहसीलदारांनी भागवत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिस प्रशासनाला दिले आहे.