भुसावळ : कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाने दुकानदारांना ठरवून दिले दिवस

1

मार्केटमधील गर्दी टळणार : नियमांचे उल्लंघण करणार्‍या दुकानदारांवर होणार कारवाई

भुसावळ : शहरात गेल्या अडीच महिन्यांच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या दोनशे पार गेल्याने तसेच तब्बल 28 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली होती तसेच प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अनुषंगाने प्रशासनाने बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांना दुकाने उघडण्याचे दिवस ठरवून दिले आहेत. या व्यतिरीक्त दुकानदारांनी दुकाने उघडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत शिवाय नागरीकांनी देखील नियमांचे उल्लंघण केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. शुक्रवारीपासून नियमांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी रामसिंग सूलाणे यांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, शहरातील हॉस्पीटल आणि मेडीकल दुकानेच केवळ 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.

रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवारी ही दुकाने सुरू
शहरातील इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी शॉप, हायजीन सॅनिटेशन, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, बुक स्टोअर्स, बेकरी, कॉस्मेटीक, टॉइज,गिप्ट, कन्फेक्शनरी, बॅटरीज, धान्य, मिठाइ दुकाने ही दुकाने रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवारी या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी पाच याच वेळात सुरू राहणार आहेत.

शनिवार, मंगळवार, गुरूवारी ही दुकाने राहणार उघडी
शहरातील फळे व भाजीपाला, कापड दुकाने, रेडीमेड शॉप, होजिअरी,फर्निशींग, साडी, टेलर शॉप, वाईन शॉप, मटण शॉप, बुट, चप्पल दुकाने, लॉण्ड्री ही दुकाने शनिवार, मंगळवार आणि गुरूवारी सकाळी 9 ते सायंकाळी पाच या वेळात उघडी राहणार आहेत.

सोमवार, मंगळवार, गुरूवारी ही दुकाने सुरू
सर्व प्रकारच्या वाहनांचे शोरूम, सर्व वाहनांचे गॅरेज, सायकल मार्ट, हार्डवेअर, बिल्डींग मटेरीयल, प्लायूड, कलर शॉप, सॅनेटरी पाईप व पंप्स, आसारी, पंक्चरची दुकाने ही दुकाने सोमवार, मंगळवार, गुरूवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 याच वेळात उघडी राहणार आहेत.

शुक्रवार व शनिवारी ही दुकाने राहणार सुरू
शहरातील भाड्यांची दुकाने, फर्निचर, बॅग हाऊस, मोबाईल दुकाने, घड्याळ दुकाने, मोबाइॅल रीपेअरींग, ऑप्टीकल, प्रिंटीग प्रेस, प्रॉपर्टी ब्रोकर्स ही शुक्रवार आणि शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात सुरू राहतील.

दुध, पेट्रोल पंप सर्व दिवस सुरू
शहरातील दुधाची दुकाने आणि पेट्रोल पंप हे सर्व दिवस सुरू राहणार असून याची वेळ सकाळी 7 ते 11 व दुपारी 4 ते 8 याच वेळात सुरू राहणार आहे.

Copy