भुसावळ कृउबाच्या स्वीकृत संचालकपदावर सचिन चौधरींची निवड

0

भुसावळ- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्विकृत संचालक पदावर युवा कार्यकर्ते सचिन संतोष चौधरी यांची निवड करण्यात आली. शुक्रवार, 30 रोजी आयोजित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक सर्वसाधारण चौधरी सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या सहकारी संस्था मतदार संघातील संचालक पद रीक्त होते. या पदासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 18 नुसार नामनिर्देशन पद्धतीने सचिन संतोष चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सूचक म्हणून कृउबा उपसभापती अशोक पंडीत पाटील यांनी तर अनुमोदक संचालक नारायण सपकाळे होते.

सचिन चौधरींवर शुभेच्छांचा वर्षाव
निवडीनंतर कृउबा सभापती सोपान भारंबे, उपसभापती अशोक पाटील, संचालक गजानन सरोदे, प्रमिला पाटील, सुभाष पाटील, होमा पाचपांडे, कैलास गव्हाणे, नारायण सपकाळे, कोकिळा पाटील, राजेंद्र जोशी, इंदूबाई महाजन, सुनील महाजन, डिगंबर कोल्हे, शेतकी संघाचे चेअरमन पंढरीनाथ पाटील, सचिव नितीन पाटील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. निवडीनंतर नवनियुक्त संचालक सचिन चौधरी यांचा संचालक मंडळ व कर्मचार्‍यांच्या वतीने शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवू -सचिन चौधरी
वडील माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अभ्यासू वृत्तीचा आपल्यादेखील काम करताना फायदा होणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे काम करणार असून शेतकर्‍यांचे ज्वलंत प्रश्‍न निश्‍चितच सोडवू, असे सचिन चौधरी यांनी सांगत बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले.

Copy