भुसावळ : कट्टा बाळगणार्‍या आरोपीला तीन दिवसांची कोठडी

0

भुसावळ : शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस भागातून विनोद लक्ष्मण चावरीया (40, वाल्मीक नगर, भुसावळ) यास आरोपीच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा शहर पोलिसांनी पकडला होता. आरोपीला शुक्रवारी भुसावळ न्यायालयाचे न्या.एस.वाय.सुल यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपीला सुनावली पोलिस कोठडी
गुरुवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास रेल्वे फिल्टर हाऊस परीसरातून संशयीत आरोपी विनोद चावरीया यास अटक करण्यात आली होती शिवाय आरोपीच्या अंग झडतीत गावठी कट्टा आढळला होता. शुक्रवारी आरोपीला भुसावळ न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.अनिल चुकेवाढ यांनी बाजू मांडली. तपास शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली साहील तडवी करीत आहेत.

Copy