भुसावळ ऑलिम्पिक स्पर्धेत सृष्टी वारके प्रथम

0

भुसावळ : येथील के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थीनी सृष्टी संजय वारके हिने नुकत्याच पार पडलेल्या भुसावळ ऑलिम्पिक 2016-17 मधील चार स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. भालाफेक, गोळाफेक, 100 मिटर धावणे आणि 100 मीटर अडथळ्याची शर्यत अशा स्पर्धांमध्ये सृष्टी विजेती ठरली. तिला क्रीडाशिक्षक रमण भोळे, नवीन नेमाडे, नेहेते यांचे मार्गदर्शन लाभले. न्हावी येथील शारदा विद्यालयातील उपशिक्षक प्रविण वारके यांची ती पुतणी आहे.