भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून कामकाज

3

भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत राष्ट्रीय संयुक्त समितीच्या निर्देशा नुसार निर्माणीत कार्यरत संलग्न युनियन व असोसिएशनच्या संयुक्त संघर्ष समितीचे निर्णयानुसार गुरूवारपासून आंदोलनास सुरुवात झाली. गुरुवारी संरक्षण उत्पादन क्षेत्रात कार्यरत सर्व 82 हजार कर्मचार्‍यांनी सरकारने घेतलेला निगमीकरणाच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला तसेच हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान व संरक्षण मंत्री यांना ई मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले व आज दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळ पासून निर्माणीतील सर्व कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले. अत्यंत शिस्तबद्ध-सोशल डिस्टन्सींगचा वापर करून कर्मचार्‍यांनी विरोध दिवस साजरा करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यांनी घेतले परीश्रम
संपूर्ण देशभरातील सर्व केंद्रीय कर्मचारी महासंघ सरकारचे निगमीकरण धोरण, एफडीआयच्या विरोधात विरोध प्रदर्शन करीत आहेत. संरक्षणच्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आवाहनावरून आंदोलन केले जात आहे. दरम्यान, संयुक्त संघर्ष समिती आयुध निर्माणी भुसावळचे सर्व पदाधिकारी व कर्मचार्‍यांसह यशस्वीतेसाठी किशोर एस पाटील, दीपक भिडे, प्रवीण मोरे, अनिल सोनवणे, गाजू गजानन चिंचोलकर, लक्ष्मण वाघ, एन.डी.पाटील, प्रशांत सपकाळे, प्रकाश नेमाडे, विजय पी.साळुंके, सूर्यभान गाढे, राजकिरण निकम यांनी परीश्रम घेतले. समितीचे संयोजक दिनेश राजगिरे, प्रकाश कदम व किशोर चौधरी यांनी सर्व सहभागी कर्मचार्‍यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले.

Copy