भुसावळ एमआयडीसी परिसरात भीषण आग

0

भुसावळ:शहरातील खडका, किन्ही शिवारातील एमआयडीसीतील ए – 12 प्लॉटमधील डिस्को इंटरप्राईजेस या इलेक्ट्रीकल वस्तू निर्मितीच्या कंपनीला लागलेल्या आगीत कंपनीसह दोन आयशर जळून खाक झाल्या. या आगीत किमान 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचे दोन व दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे एक अशा तीन बंबांनी तब्बल 10 ते 12 फेऱ्या करुनही आगीवर नियंत्रण आले नव्हते. दरम्यान आगीची माहिती मिळताच बाजारपेठ व तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले.

Copy