भुसावळात 50 हजारांचे टँकर चोरट्यांनी लांबवले

0

भुसावळ : बांधकामाच्या ठिकाणी उभे असलेले टँकरच चोरट्यांनी लांबवल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोमवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर रोडवरील हिरा नगरात बांधकाम सुरू असून तेथे निळ्या रंगाचे आणि त्यावर पांढरा पट्टा असलेले पाच हजार लीटर पाण्याची क्षमता असलेले सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे टँकर उभे होते मात्र चोरट्यांनी 1 ते 17 जुलैदरम्यान ते केव्हातरी लांबवले. या प्रकरणी राजू भानुदास चौधरी यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सुनील जोशी पुढील तपास करीत आहेत.

Copy