Private Advt

भुसावळात 15 जून रोजी रेल्वेची ऑनलाईन पेन्शन अदालत

0

भुसावळ : सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम प्रशासनाचा भाग म्हणून भुसावळ रेल्वे विभागात पेन्शन अदालत सोमवार, 15 जून रोजी सकाळी 11 वाजता भुसावळच्या मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे. पेन्शनर बांधवांनी मोबाईलवर संपर्क साधून ई-मेलद्वारे पेन्शन धारकांच्या तक्रारीचे शासनाच्या वर्तमान दिशा निदशानुसार तत्परतेने निराकरण केले जाणार आहे.

तक्रारीसाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी आपल्या तक्रारीचे अर्ज वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी, भुसावळ, यांना ऑनलाइन इंग्रजीत ई-मेल-बीएसएलपेंशनअदालत2020जीमेल.कॉम वर सादर करावेत. अर्जात आपले नाव, पदनाव, भरती तारीख आपल्या तक्रारीचे स्वरूप इत्यादी नमूद करावे व अर्जासोबत पासबुक, पीपीओ व आधार कार्डची झेरॉक्स स्व सत्यापीत करून पीडीएफ फाईलमध्ये उपरोक्त ई-मेल वर पाठवावे.
अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 11 मे रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाने कळवले आहे.