Private Advt

भुसावळात 15 जून रोजी पेन्शन अदालत

भुसावळ : सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी शहरात पेन्शन अदालतीचे बुधवार, 15 जून रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ डीआरएम कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन अदालतीत केवळ पेन्शनशी संबंधित प्रकरणेच घेतली जातील (पॉलिसी बाबींचा समावेश असलेली तक्रार (उदा. कौटुंबिक पेन्शन प्रकरणे, नाव समाविष्ट प्रकरणे इ.), कायदेशीर मुद्दे (न्यायालयातील प्रकरणे) पेन्शन अदालतमध्ये घेता येणार नाहीत, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

30 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि पेन्शन व सेटलमेंट देयकाबाबत तक्रारी असलेले कर्मचारी आहेत त्यांनी आपल्या तक्रारींचे अर्ज (तीन प्रतीत) वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी, भुसावळ यांना पाठवावे, असे कळवण्यात आले आहे. या अर्जात आपले नाव, पद, भरती तारीख, बँक खाते क्रमांक, बँक आयएफएससी कोड, तक्रारींचे स्वरूप इत्यादी नमूद करावे तसेच अर्जासोबत पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), बँकेच्या पेन्शन स्लिपची, पास बुकची झेरॉक्स तसेच आवश्यक दस्तावेज जोडावी, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान, भुसावळ डीआरएम कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील ड्रॉप बॉक्समध्ये आवेदन पत्र शनिवार, 30 एप्रिलपर्यंत सादर करता येणार आहे.