भालोदसह अकलूजच्या रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा

0

नियमापेक्षा लाभार्थींना कमी धान्य दिल्याचे उघड : कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी

फैजपूर : कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरीकांना अन्नधान्य वेळेवर मिळावे म्हणून नागरी पुरवठा विभाग कार्यतत्पर झाले असून फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुवर व स्थानिक मंडळ अधिकारी यांनी दक्षता घेऊन तालुक्यातील भालोद व अकलूज या गावातील दोन स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना शासकीय नियमापेक्षा दुकानदार हा लाभार्थ्यांना कमी धान्य देत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमी धान्य दिल्याने झाली कारवाई
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भालोद, तालुका यावल येथील बळीराम एम.चौधरी यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक 74 यांच्या दुकानात उपस्थित ग्राहकांना धान्य दुकानदार यांनी किती धान्य वाटप केले आहे याची खातरजमा माहिती घेण्यासाठी तसेच तपासणी करण्यासाठी गेले असता संबंधित दुकानदार हा ग्राहकांना शासनाने ठरवलेल्या अपेक्षा कमी धान्य देत असल्याचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, याठिकाणी तहसीलदार जितेंद्र कुवर, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, यावल तहसीलचे पुरवठा विभाग अव्वल कारकून राजेंद्र भंगाळे यांनी मिळून ग्राहकांची धान्य तपासणी करून त्यांचे जबाब घेतले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील अकलूज येथील राजू गिरधर कोळी यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक 89 यांनी कोणतेही धान्य ग्राहकांना न देता त्यांच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य मिळाले नसल्याने बामणोदचे मंडळाधिकारी बी.एम.पवार यांनी फैजपुर पोलीस स्टेशनला संबंधित दुकानदारांच्या विरुद्ध तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy