भुसावळात हद्दपार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

3

भुसावळ : हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करून शहरात आलेल्या प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (27, रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून नाहाटा चौफुलीजवळून रविवारी रात्री उशिरा अटक केली. आरोपीविरुद्ध हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, नाईक रमण सुरळकर, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव आदींनी केली.

Copy