भुसावळात हद्दपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- गुन्हेगारी पार्श्‍वभूमीमुळे दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (32, अमरनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दिनेश कापडणे यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.