Private Advt

भुसावळात स्व.कुंदन ढाकेंच्या स्मरणार्थ युवा पुरस्काराचे वितरण

पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात कार्यक्रम : स्व.कुंदनदादांच्या आठवणींनी मान्यवर गहिवरले

भुसावळ : शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात ‘दैनिक जनशक्ती’चे माजी मुख्य संपादक व सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन तथा उद्योजक स्व.कुंदन ढाके यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या तरुणाईस ‘युवा पुरस्कारा’ने मान्यवरांच्याहस्ते बुधवार, 22 डिसेंबर रोजी गौरवण्यात आले.

स्व.कुंदन ढाकेंच्या कार्याला उजाळा
शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात बुधवारी केतन विलास फिरके लिखीत ‘द एम्पावरींग युनिकनेस’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी उद्योजक तथा सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन स्व.कुंदन ढाके यांच्या कार्याला मान्यवरांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला. शिक्षकाच्या मुलाने अल्प काळात उद्योजक होवून केलेली प्रगती कौतुकास्पद असून दुर्दैवाने कोरोनाने त्यांना आपल्यातून हिरावून नेल्याची खंतही मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
दैनिक जनशक्तीचे संपादक यतीनदादा ढाके यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमासाठी विचार मंचावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, महाविद्यालयाच्या प्राचार्य मीनाक्षी वायकोळे, ‘जनशक्ती’चे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी, नेहरू युवा केंद्राचे नरेंदर डागर, माजी पोलिस पाटील मधुकर पाटील, पुरनाड सरपंच मनीषा देशमुख, उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे, दिनेश भंगाळे, स्वच्छतादूत रणजीत राजपूत, रजत बढे, शुभम महाजन, प्रा.स्मिता चौधरी आदींची उपस्थिती होती.

या तरुणाईचा युवा पुरस्काराने सन्मान
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तरुणाईचा युवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यात एनसीसी, एनएसएसमधील कॅडेटचाही समावेश आहे. पुरस्कारार्थींमध्ये वैष्णवी पाचपांडे, सुजीत भंवर, सुशीर प्रजापती, दीपक चौधरी, कोमल पाटील, सौरभ दुबोळे, तेजस गांधेले, इरफान शेख, मयुर भंगाळे, अभिषेक पाटील, कौस्तुभ मंत्री, जागृत पाटील, प्रफुल्ल बारी, पृथ्वीराज पाटील, हर्षदा पोळ, निर्मल चोरडीया, कल्याण पराळे, सायली महाजन आदींचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन संस्कृती उगले तर आभार पुष्पक चौधरी यांनी मानले.