भुसावळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट : रेल्वे कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा संदेश प्रसारीत केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी रमेश पांडुरंग इंगळे (54, आराधना कॉलनीजवळ, खळवाडी, भुसावळ) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. इंगळे यांनी रेल्वे कर्मचार्‍याच्या एसएसईपीवेएमएलबीएसएल नावाच्या ग्रुपवर 5 रोजी दुपारी 2.20 वाजता आक्षेपार्ह संदेश टाकल्यानंतर ग्रुपचे अ‍ॅडमिन, तक्रारदार तथा ट्रॅकमॅन शेख मोहम्मद हाफीस मो.रफीक (27, चाळीस बंगला, भुसावळ) यांनी त्यांना ग्रुपमधून रीमूव्ह केल्यानंतर इंगळे यांनी शेख मोहम्मद यांना पुुन्हा दूरध्वनी करीत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या प्रकरणी ट्रॅकमॅन शेख मोहम्मद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद करीत आहेत.

Copy