भुसावळात सोशल डिस्टन्सला हरताळ : दुकानदाराला दंड

0

भुसावळात सोशल डिस्टन्सला हरताळ : दुकानदाराला दहा हजारांचा दंड

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात असताना काही किराणा दुकानांवर गर्दी कायम असल्याने मंगळवारी पालिकेच्या पथकाने बाजारपेठेतील संत सेना महाराज व्यापारी संकुलातील श्रीकृष्ण किराणा दुकानाचे मालक सुरेश तलरेजा यांना दहा हजारांचा दंड केला. या दुकानावर सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे पथकाला आढळल्याने मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या नेतृत्वाखाली नगर अभियंता पंकज पन्हाळे, लेखापाल संजय बाणाईते, प्रशासकिय अधिकारी शे. परवेज, आरेखक महेश चौधरी, अभियंता सुरज नारखेडे, राजीव वाघ, विजय तोष्णीवाल, लोकेश ढाके, सचिन नारखेडे, संतोष पोटपल्लीवार, शाम गिरी, धनराज बाविस्कर आदींच्या पथकाने कारवाई केली.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन
पालिकेच्या पथकाकडून सोशल डिस्टंन्सिंगचे नियम न पाळणे, बंदच्या काळात इतर दुकाने सुरू ठेवणार्‍यांवरही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासोबत नागरीकांनी घराबाहेर निघताना मास्कचा वापर करावा, विक्रेत्यांनी मास्कसोबत हॅण्डग्लोज वापरावे तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, असे आवाहन मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी केले आहे.

Copy