भुसावळात सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपी विवाहबद्ध

0

मुस्लीम मणियार एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम ; संसारोपयोगी वस्तूंचे वाटप

भुसावळ- मुस्लीम मणियार एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीतर्फे खडका रोडवरील पालिकेच्या शाळा क्रमांक 28 मध्ये मण्यार समाजाचा वधू-वर मेळावा होवून त्यात तीन जोडपी विवाहबद्ध झाली. विवाह सोहळ्यात वधू-वरांकडून कोणतीही रक्कम घेण्यात आली नाही तर वधू-वरांना संसारासाठी भांडी, गॅस कनेक्शन देण्यात आले. मेळाव्याच्या सुरुवातीला फुरकान अहमद मोहम्मद इकबाल यांनी तिलावते कुराण म्हटले. मोहम्मद मोहमशीन पटेल यांनी नातपठण केले. मौलाना अब्दुल हकीम व मुफ्ती जावीद यांनी सामूहिक विवाहाचे महत्त्व पटवून दिले. मौलाना अब्दुल हकीम यांनी खुतबा ए निकाह चे पठण केले. गुलनाज बी. व शेख सज्जाद, हीना नाज व सय्यद युसूफ, आफरीन व मोहम्मद अवेस ही जोडवी विवाहबद्ध झाली. यावेळी डॉ.अताऊर रहेमान, डॉ. शकील, नगरसेवक हाजी सलीम पिंजारी, डी.डी.शकील, नसीम तडवी, हनीफ खान यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वितेसाठी मुस्लीम मणियार एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद इद्रिस, उपाध्यक्ष यासीन, शेख अय्यूब, शेख जाकीर, काशिफ शेख, शेख सलीम आदींनी परीश्रम घेतले. हारून उस्मानी यांनी सूत्रसंचालन केले.