भुसावळात साडेचार हजारांचा गुटखा जप्त ः एकाला अटक

0

भुसावळ ः शहरात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी दुपारी अडीच वाजता कारवाई करीत एका आरोसीप अटक करीत त्याच्या ताब्यातून चार हजार 490 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. कैलास अशोक अग्रवाल (32, रा.शिवाजी नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर एका अल्पवयीन संशयीतालादेखील ताब्यातघ घेण्यात आले आहे. जप्त पान मसाला (गुटखा) अन्न पुरवठा अधिकारी साळुंके यांच्या ताब्यात देण्यात आला.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, किशोर महाजन, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, तुषार पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली.

Copy