Private Advt

भुसावळात सहा.लोकोपायलटले लुटले : पाचवा पसार आरोपी अखेर जाळ्यात

भुसावळ : रेल्वे ड्यूटी संपवून घराकडे निघालेल्या रेल्वेतील सहा.लोकोपायलट यास मारहाण करीत दोन मोबाईल, सोन्याची चैन, बॅग लुटल्याची घटना शहरातील रेल्वे गार्ड लाईन रोडवर 20 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी सहा.लोकोपायलट चंदन अनिरुद्ध प्रसाद (28, रा.संभाजी नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करीत चौघा आरोपींना दोन दिवसांपूर्वी अटक केली होती तर या गुन्ह्यातील पाचव्या पसार आरोपीस शुक्रवारी अटक करण्यात आली. मनीष उर्फ पप्प्या राजु साळवे (22, पंधरा बंगला, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

लुटीच्या गुन्ह्यात चौघांना अटक
या गुन्ह्यात शाहरूख शेख रज्जाक (25, रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ), विनायक उर्फ विनल प्रल्हाद वाघ (22, रा.समता नगर, भुसावळ), ईश्वर उर्फ करण कमलेश दमाडे (22, रा.गांधी नगर, भुसावळ), यश अशोक परदेशी (20, पूजा कॉम्प्लेक्स मागे, भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे तर चौघा आरोपींना न्यायालयाने शनिवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक हरीष भोये, नाईक विकास सातदिवे, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, दिनेश कापडणे, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, योगेश माळी, परेश बिर्‍हाडे, जीवन कापडे आदींच्या पथकाने केली. तपास सहा.निरीक्षक हरीष भोये, योगेश महाजन करीत आहेत.