भुसावळात विवाहितेची आत्महत्या

0

भुसावळ : अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या शहरातील 21 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सोमवारी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली. काजल योगेश डोळे (21, संत धाम जवळ, भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेचे पती योगेश डोळे हे संगमनेर येथे वीज कंपनीत नोकरीस असून विवाहिता शहरात सासू, सासरे, दिर यांच्या समवेत राहाते. बेडरूमचा दरवाजा बंद करीत विवाहितेने आत्महत्या केली. पंकज हिवाळे यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील पुढील तपास करीत आहे.

Copy