भुसावळात वाईप शॉप, प्रिंटींग प्रेस व भांडे दुकानांना आठवडाभर परवानगी

1

प्रांताधिकार्‍यांनी काढले आदेश : किराणा व्यावसायीकांनाही मिळावा दिलासा

भुसावळ : भुसावळात वाढत्या कोरोना फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर व गर्दी नियंत्रीत करण्यासाठी प्रांताधिकार्‍यांनी सम व विषम तारखांना दुकानदारांना दुकाने उघडण्याचे दिवस व वेळ ठरवून दिली होती तर काही व्यावसायीकांनी तीन महिने लॉकडाऊनमुळे नुकसान झाल्याने व्यवसायाचे दिवस वाढवून देण्याची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर बुधवार, 17 रोजी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी आदेश जाहीर केले आहेत.

या दुकानांना आठवडाभर परवानगी
चष्म्याची दुकाने, सॉ मील, फोटोशॉप, प्रिंटींग प्रेस, ऑनलाईन मनी ट्रान्सपर केंद्र, भांडे विक्रीची दुकाने तसेच वाईन शॉप विक्रीच्या दुकानांना आठवडाभर परवानगी देण्यात आली सकाळी नऊ ते पाच या दरम्यान ही दुकाने खुली राहणार आहेत. सोशल डिस्टन्स व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे या दुकानदारांना काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या दुकानांना चार दिवस परवानगी
बॅग शॉप, गादी भंडार, घड्याळ दुकाने, ब्रास बॅण्ड कार्यालय (केवळ बुकींग करीता) यांना रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.

किराणा व्यावसायीकांना मिळावा दिलासा
शहरातील किराणा दुकान व शॉपीबाहेर होणारी गर्दी पाहता प्रशासनाने आठवड्यातून केवळ चार दिवस दुकाने सुरू ठेवण्यास शहरात परवानगी दिली असलीतरी या व्यावसायीकांमधूनही आठवडाभर दुकाने सुरू ठेवण्याबाबत परवानगी मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

Copy