भुसावळात लॉकडाऊनमध्ये गावठी दारूची विक्री : दोघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीत गावठी दारूची चोरट्या मार्गाने विक्री होत असल्याची गोपनीय महिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पंचशील नगरातील नाल्याच्या बाजूला पोलिसांनी धाड टाकत एकाला पकडण्यात आले तर दुसरा आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. बुधवारी दुपारी दिड वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपी शेख वसीम शेख चांद (रा.पंचशील नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी नितीन उर्फ टक्कल मधुकर कांडेलकर (रा.कृष्णा नगर, भुसावळ) हा पसार होण्यात यशस्वी झाला. आरोपींच्या ताब्यातून 600 रुपये किंमतीची 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली तसेच त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रवींद्र बिर्‍हाडे, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली.

Copy