भुसावळात लग्नघरी आग : 70 हजारांचे नुकसान

0

भुसावळ : शहरातील रेल्वे दवाखान्यातील आंबेडकर नगरात लग्नघरी स्वयंपाक सुरू असताना अचानक सिलिंडरचा भडका उडून आग लागल्याने लग्नासाठी आणलेल्या किराणा सामानासह घरातील अन्य साहित्य जळाल्याने 70 हजारांचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी मिलिंद लालदास रंधे (53, रा.आंबेडकर नगर, रेल्वे दवाखाना मागे, भुसावळ) यांच्या खबरीनुसार शहर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. रंधे कुटुंबातील मुलीचे लग्न असल्याने त्यासाठी किराणा सामान आणण्यात आला होता तर शुक्रवारी सकाळी 11 वाजता स्वयंपाक सुरू असताना अचानक सिलिंडरचा भडका उडाल्याने आग लागून लग्नाच्या स्वयंपाकासाठी आणलेल्या किराणा मालाचे नुकसान झाले तसेच फ्रिज वाशींग मशीन, वॉटर फिल्टर, मिक्सर मिळून सुमारे 70 हजारांचे नुकसान झाले. तपास हवालदार संजय सोनवणे करीत आहेत.

Copy