भुसावळात रेल्वे वॉरंटमधील आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : रेल्वे न्यायालयाने जारी केलेल्या एनबीडब्ल्यू वॉरंटमधील आरोपीच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जाम मोहल्ला भागातून मुसक्या आवळल्या आहेत. शेख अकील उर्फ लंबु शेख मोयोद्दीन (43, रा.जाममोहल्ला, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, अतुल कुमावत व रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल खोडके, पांडुरंग वसु आदींच्या पथकाने केली. आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.