भुसावळात रेल्वेचे आरक्षण कार्यालय झाले सुरू

3

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन सुरू असल्याने रेल्वेचे आरक्षण कार्यालय हे बंद करण्यात आले होते मात्र रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार हे आरक्षण कार्यालय शुक्रवार, 22 मे पासून भुसावळ मंडळातील आरक्षण कार्यालय आपल्या वेळेनुसार सुरू करण्यात आले आहेत. आरक्षण तिकीट रद्द करण्याची प्रक्रियाही दिनांक 25 मे पासून सुरू होत आहे शिवाय आरक्षण धारकांनी आपले आरक्षण तिकीट हे रद्द करण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले असून गर्दीमुळे आरोग्याला धोका पोहोचण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. ज्या प्रवाशांच्या गाड्या रद्द झाल्या आहेत, अशा प्रवाशांच्या आरक्षण तिकिटाचा परतावा हा सहा महिन्याच्या मुदतीपर्यंत दिला जाईल त्यामुळे त्यांनी स्टेशनवर गर्दी करून, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

Copy