भुसावळात रस्तालुट प्रकरणातील आरोपी जेरबंद

0

भुसावळ । येथील टिंबर मार्केटमध्ये एका ईसमास रस्त्यात अडवून लुट करणार्‍या अट्टल गुन्हेगारास भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी मोठ्या शिताफिने जेरबंद केले आहे.स्थानिक राहूल नगरमधील अरुण उत्तम रणधीर हे 7 रोजी 5-30 वाजेच्या सुमारास टिंबर मार्केट मधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊन जवळून जात असतांना वाल्मिकनगर मधील शम्मी प्रल्हाद चावरिया याने त्यांना रस्त्यात अडवून बळजबरीने 1 हजार रुपयांची लुट करुन पोबारा केला होता.

सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी चंद्रकांत सरोदे, राजेंद्र तोडकर, संजय भदाणे, दिपक जाधव,निलेश बाविस्कर,प्रशांत चव्हाण,राहूल चौधरी व बंटी कापडणे यांच्या पथकाने सापळा रचून शम्मी चावरिया यांस ताब्यात घेतले.तपास एएसआय रफीक काझी हे करीत आहे