Private Advt

भुसावळात युवकाचा मोबाईल हिसकावला : एकाला अटक

भुसावळ : युवकाला अडवत त्याच्याकडील मोबाईल लांबवणार्‍या एकाच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. इम्रान रसूल शेख (18, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवकाला अडवत लांबवला मोबाईल
शनिवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अक्रम जुबेर देशमुख (रा. साकेगाव) हे त्यांचा मित्र अजीम सोबत साकेगाव येथे जात असतांना भारत नगराजवळ त्यांची दुचाकी संशयीत इम्रान रसूल शेख (18, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) व आफताब रोशन अली सैय्यद (रा.भारत नगर, भुसावळ) यांनी अडवून खिशातील 16 हजारांचा मोबाईल हिसकावला होता. या प्रकरणी देशमुख यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी ईमरान शेख याला अटक केली. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे करीत आहेत. अन्य संशयीताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.