भुसावळात युवकाचा खून : तिघे आरोपी जाळ्यात

किरकोळ वाद बेतला जीवावर : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती

भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळ शहरातील लिम्पस क्लब रीक्षा स्टॉपजवळ सुमारे 34 वर्षीय इसमाची किरकोळ कारणावरून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती. सकाळी खुनाचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर अवघ्या आठ तासात गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयीतांना अटक केली आहे. या घटनेत संदीप एकनाथ गायकवाड (34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या इसमाचा खून झाला असून किरकोळ वादातून तिघांनी गायकवाड यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. यावेळी शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहा.निरीक्षक संदीप दुणगहू उपस्थित होते.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अर्चित चांडक, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुणगहू, शहर व बाजारपेठचे हवालदार राजेश बोदडे, हवालदार संजय सोनवणे, हवालदार मो.वली सैय्यद, सोपान पाटील, जुबेर शेख, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख यांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

(सविस्तर थोड्याच वेळाच)